विज्ञान दिनाला, विद्यार्थ्यांनी केले, वेगवेगळे प्रयोग | National Science Day
श्री चंद्रशेखर विद्यालयात विज्ञान दिन साजरा

श्री चंद्रशेखर विद्यालयात विज्ञान दिन साजरा
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालयांमध्ये विज्ञान दिन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांचे प्रात्यक्षिके करून साजरा केला. शाळेनी विद्यार्थ्यांची तयारी चांगली करून घेतली होती. विज्ञान दिनाचे औचित्य साधून अनेक विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती येऊन वेगवेगळे प्रयोग करून त्याची माहिती आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना, मित्रांना दिली. यावेळी अनेक शास्त्रज्ञांचे विषयी माहिती आधटराव सर, सावंत मॅडम व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे, पर्यवेक्षक आधटराव सर, सिताराम गुरव सर, जुनियर कॉलेज विभागाचे प्रमुख सुनील गवळी सर, फुले सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.घाडगे हिने केले. तर आभार कोष्टी मॅडम यांनी मानले.



