न्यू डायमंड इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोशात | महाळुंग-श्रीपूर मधील विधार्थ्याना डायमंड प्रमाणे घडविणारी स्कूल
वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण

महाळुंग-श्रीपूर मध्ये “न्यू डायमंड इंग्लिश स्कूल” चा मोठा जल्लोष
श्रीपूर ता.माळशिरस येथील पांडुरंग बहुउद्देशीय संशोधन संस्था संचलित “न्यू डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल”, च्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण अत्यंत थाटामाटा मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून साजरा करण्यात आले. यावेळी ह. भ प. श्री.गुरु बापूसाहेब मोरे महाराज देहूकर यांच्या वाणीतून स्कूल च्या उभा राहिलेले नविन वास्तु साठी त्यांच्या आशीर्वादी रुपी शब्दात त्यांनी गौरव केला आणि अत्यंत नाजूक परिस्थिती मधून ही स्कूल उभा राहत असताना येणाऱ्या अडचणी वरती मात करून जे यश मिळवलेले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे, कोणतीही आर्थिक परिस्थितीचा पाठींबा नसताना,प्रतिकूल परिस्थिती मधून जो व्यक्ती यशस्वी होतो नक्कीच त्याच्या अंगी पुरुषार्थ असतो अशा प्रकारचे उदगार मोरे महाराजांनी काढले.या सू-शोभित कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.प्रा. श्री.दत्तात्रय बागडे(प्राचार्य – शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज),मा.प्रा.श्री. हेमंत बरडे (संस्थापक),श्री.गणपत बरडे (जेष्ठ डायरेक्टर),सुरेखा बरडे,नवनाथ बरडे,तसेच श्री.महावीर शहा (मा.अध्यक्ष सन्मति सेवा दल), अँड.श्री.जयसिंग पाटील (माळशिरस कोर्ट)मा.श्री. अमर पिसाळ देशमुख (यशस्वी उद्योजक), नानासाहेब मुंडफणे,जीवन मोहिते,अशोक सुर्वे,राजु पवार,तय्यब डांगे अँड.श्री. अल्ताफ आतार,अँड.श्र.धनंजय बाबर श्री.देविदास काळे,डॉ.बाळासो देवकते,हनुमंत चव्हाण (सर) संजय मोहिते (सर) सागर सरगर (सर) सचिन पवार अश्वराज वाघ सर, सर्व विद्यार्थी पालक वर्ग,त्याचप्रमाणे पत्रकार बंधू बी.टी.शिवशरण,महादेव जाधव, आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, लोकगीते,गोंधळी गीते,नाटक, भारुड, लावणी अशा प्रकारच्या वेगवेेगळ्या कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या तज्ञ सचिवा मा. सौ. रोहिणी बरडे मॅडम यांनी केले. सूत्रसंचलन सौ.डांगे मॅडम आणि आभार प्रदर्शन सौ.हजारे मॅडम यांनी केले.