अकलूज मध्ये होणार बास्केटबॉल संघाची निवड चाचणी.
९ मे ते १३ मे दरम्यान 13 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे होणार

अकलूज येथे १३ वर्षांखालील बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघाची निवड चाचणी.
अकलूज दि.१ (केदार लोहकरे) महा बास्केटबॉल असोसिएशन तर्फे दि.९ मे ते १३ मे दरम्यान 13 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा ॲम्युचर बास्केट बॉल असोसिएशनच्या वतीने दि.३ मे २०२३ रोजी मुलांची व दि.४ मे २०२३ रोजी मुलींची अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सोलापूर जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात येणार आहे या निवड चाचणीसाठी दि.१ जानेवारी २०१० नंतर जन्मलेला खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र राहतील . खेळाडूंनी सोबत एलिजबिलिटी फॉर्म व आधारकार्ड सहित ३ मे २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत मुलांनी तर ४ मे २०२३ रोजी मुलींनी उपस्थित रहावे. सोबत ग्रामपंचायत/जिल्हा परिषद/महानगरपालिका जन्म दाखला (मुळ प्रत) जो ३ वर्षाच्या आतील नोंदविलेला असणे आवश्यक आहे .या निवड चाचणीमध्ये सहभाग घेण्यासाठी क्रिडा शिक्षक प्रदिप पांढरे सर (मो.नं.९०४९०४७७००) व शशांक गायकवाड (मो.नं.९८६०४२१४४४) यांच्याशी संपर्क साधावा.
सोलापूर जिल्हातील १३ वर्षा खालील बास्केटबॉल खेळाडू मुला-मुलीनी अकलूज येथील जिल्हा निवड चाचणीसाठी सहभागी होऊन.पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर शहर व जिल्हा ॲम्युचर बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व सचिव एम.शफी सर यांनी केले आहे.