राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत पृथ्वीराज संजय चौरे चे यश
शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेतील यश.

अकलूज (केदार लोहकरे ) अमरावती येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत शंकरराव मोहिते महाविद्यालयातील पृथ्वीराज संजय चौरे या विद्यार्थांने धनुर्विद्या स्पर्धेत यश मिळवले आहे.पृथ्वीराज चवरे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील कला शाखेतील विद्यार्थी असून.त्याने दि.२१ ते २३ एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा अमरावती येथे विभागीय क्रिडा संकुलमध्ये घेण्यात आली.या स्पर्धेत पृथ्वीराज चवरे याने धनुर्विदेतील उपप्रकार रिकर्व्ह ७० प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.तसेच टिम इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, अकलुजचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय बागडे,पर्यवेक्षक राजकुमार इंगोले,कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे, तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले.