एसटी कर्मचाऱ्यांचा लिनेन्स महिला क्लब कडून सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
लिनेन्स महिला क्लबने कर्मचाऱ्यांचा केला सन्मान.

एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार समारंभ संपन्न.
संग्रामनगर (संजय लोहकरे) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सेवेतून वयोमानानुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन लिनेन्स महिला क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला.या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज एस.टी आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी अहोरात्र प्रवाशांचे सेवा करत असतात.त्यामध्ये एस.टीचे. चालक,वाहक,वाहन रिपेअरी करणारे कर्मचारी,वाहतूक नियंत्रण यांचे योगदान मोठे असते.दररोज प्रवाशांची सेवा करत असताना सेवानिवृत्त वय कधी येते ते या कर्मचाऱ्यांना समजत नाही.वयोमानानुसार शासनाच्या नियमानुसार त्यांना सेवानिवृत्त घ्यावी लागते.पण सतत प्रवाशांची सेवा करणा-या कामगारांची दखल कोणी घेत नाही.पण आज ती उणीव लिनेन्स महिला क्लबच्या महिलांनी या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
एस.टी कर्मचाऱ्यांचा जीवनाचा प्रवास हा खडतर असतो.सर्व प्रवाशी लोकांची काळजी घेणे.वृध्द,अपंग लोकांना सांभाळून योग्य त्या ठिकाणी सोडणे.विद्यार्थ्यांची काळजी घेणे.महिलांना सन्मानाने वागविणे अशी अनेक काम करत असताना.कोरोना संकटाच्या काळात ही ऊन,वारा,पाऊस् विसरून एस.टी कर्मचारी कार्यरत होते.
हे सर्व कर्मचारी वेतनापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षित सेवेत आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ घालवतात व प्रवाशाच्या सेवेतच धन्यता मानत.निवृत्तीनंतर मिळणा-या चार-पाच हजार निवृत्ती वेतनमध्ये संसाराचा गाडा का हकावा या विवंचनेत हे कर्मचारी असतात.
आज सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चालक विलास कळसुले,विलास शिंदे,अशोक पिसे,गोपाळ सावंत,मनोज इनामके,वाहतूक नियंत्रक तुकाराम राऊत शिपाई अंकुश पाटील,यांत्रिक कर्मचारी आबा पाताळे,जीवन सराटे,मधू नरळे,शब्बीर काझी,आगतराव गळगुंडे या सर्व कर्मचारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार लिनेन्स महिला क्लबच्या अध्यक्षा सौ.छाया बुराडे,सौ.संगीता दोशी, सचिव.सौ.राजश्री जगताप,सौ.सुप्रिया मुदगल,सौ.योगिता ओसवाल,सौ.संध्या जाधव यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी अशोक खाडे,उदय दुपडे,विजय रणदिवे,बापू बनसोडे उपस्थित होते.