महाराष्ट्र

पर्यावरण दिन | लीनेंस क्लबच्या महिलांकडून सुवासिनी महिलांना अनोखी भेट

अकलूजच्या लीनेंस क्लबच्या वतीने अनोखी वटपौर्णिमा साजरी.

अकलूज  ( संजय लोहकरे) ५ जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वटपौर्णिमाच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी येत होत्या त्यावेळेस लीनेंस क्लबच्या महिलांनी प्रत्येक सुवासिनी महिलांना एक वडाच्या झाडाचे रोप भेट दिले ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावून महिलांनी त्याचे संगोपन व काळजी घ्यावी असे आवाहन केले.

            अकलूज येथील लीनेंस क्लबच्या महिला नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून ख-या अर्थाने समाज सेवा करीत असतात.आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसें दिवस कमी होत चालले आहे.याचा अनुभव लोकांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनसाठी आपले आप्तेष्ट,नातेवाईक गमवायची पाळी आली होती.हि वेळ परत कोणावर येऊ नये यासाठी लीनेंस क्लबच्या महिलांनी वतीने आज अनोखी सुवासिनी महिलांना भेट दिली आहे.

       वटपौर्णिमानिमीत्त सुवासिनी महिला वडाच्या झाडाला पुजा करून फे-या मारून झाल्यानंतर प्रत्येक एक महिलेला एक वडाच्या झाडाचे रोप दत्तक देऊन ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावून त्याला मोठे करावे.जेणे करून परिसरात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल व आपले आरोग्य चांगले राहील.

             हा उपक्रम राबविण्यासाठी लीनेंस क्लबच्या अध्यक्षा सौ.छाया बुराडे,उपाध्यक्ष सौ.संगीता दोशी, सचिव सौ.राजश्री जगताप,सौ.सुप्रिया मुदगल,सौ.योगिता ओसवाल सौ.संध्या जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!