महाराष्ट्र

अक्षय भालेराव खून प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश

वैभव गिते यांनी घेतली गृहविभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सचिवांची भेट 

वैभव गिते यांनी घेतली गृहविभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सचिवांची भेट 

नांदेड अक्षय भालेराव खून प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड येथे अक्षय भालेराव खून प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे याची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.वैभव गिते यांनी अक्षय भालेराव हत्या प्रकरणी चालू असलेला तपासावर आक्षेप घेत तपास गुणवत्तेच्या आधारावर होत नाही.तपासाची व्हिडीओ रोकोर्डिंग नाही.महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब घेतलेले नाहीत.एट्रोसिटी ऍक्ट ची महत्वाची कलमे लावलेली नाहीत.गुन्ह्यात जन्मठेप व मृत्यू दंडाचे एट्रो सिटीचे 3 (2) 5, व  कट केल्याचे 120 ब हे कलम लावलेले नाही.विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झालेली नाही.परिस्थिती जन्य व तांत्रिक पुरावे घेतलेले नाहीत.फरार असलेला आरोपी चार दिवस कुठे होता?त्यास फरार होण्यासाठी कोणी मदत केली?दरम्यानच्या काळात कुणाच्या संपर्कात होता.फरार असताना ज्या वाहनांची मदत घेतली आहे ती वाहने (गाड्या) जप्त केल्या नाहीत.याचा तपास करून सहआरोपी करावे.अशा प्रकारचे 1 ते 31 प्रकारचे मुद्यांचे निवेदन दिले.महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन लागलीच म्हणजे निवेदन दिल्या दिल्या अपर मुख्य सचिव गृह विभाग,पोलीस महासंचालक,आयुक्त समाजकल्याण पुणे,जिल्हाधिकारी नांदेड,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शासनाने दिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की वैभव गिते यांनी दिलेल्या पत्रातील मुद्दे गंभीर स्वरूपाचे असून सदर मुद्यांच्या अनुषंगाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी.तसेच सदर प्रकरण गंभीर असल्यानेआवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे शासनाने पत्रात लिहले आहे.एकाचवेळी तीन IAS सनदी अधिकारी व तीन IPS अधिकाऱ्यांना शासनाने पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.मंत्रालयीन स्तरावर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याने नांदेड पोलीस प्रशासनाला कारवाई करावीच लागेल असे राज्य सचिव वैभव गिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके राज्य सहसचिव पी.एस.खंदारे,यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव गिते,पंचशीलाताई कुंभारकर,शशीकांत खंडागळे, बंदिश सोनवणे,नरेश जाधव,राजेश साळे, नवनाथ भागवत,प्रणव भागवत यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!