महाराष्ट्र

नांदेडच्या घटनेचा महाळुंग मध्ये रास्ता रोको करून केला निषेध

आरोपींना ताबडतोब कठोर शिक्षा करा

महाळुंग (ता. माळशिरस) येथे महाराष्ट्रामधील दलित समाजावरील वाढते अत्याचाराचा निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंग मुख्य चौकात रिपाई आठवले शाखा महाळुंग यांच्यावतीने रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला.

नांदेड जिल्ह्यातील बोंडार हावेली गावातील अक्षय भालेराव या तरुणाची झालेली हत्या, त्याचबरोबर मुंबई येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मागासवर्गीय तरुणीचा झालेला खून त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे मातंग समाजातील गिरीरत्न तबकाले हिची हत्या या सर्व घटनांचा निषेध करण्यात आला.

यावेळी मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. अक्षय भालेराव च्या कुटुंबातील सदस्याला नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, तपास सीआयडी कडे देण्यात यावा, आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी, मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माइंड पर्यंत पोचण्याकरता आरोपी आणि सहकार्य करणाऱ्या नेत्यांचे सीडीआर तपासण्यात यावेत, अक्षय भालेराव च्या कुटुंबाला शासकीय मदत जाहीर करावी. त्याच बरोबर मुंबई येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मागासवर्ग तरुणीचा अत्याचार करून खून करण्यात आला या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आदी मागण्यांचे निवेदन रिपाइं आठवले यांच्या वतीने अकलूज    पीएसआय स्वाती कांबळे मॅडम, ए एस आय बाळासाहेब पानसरे, किशोर गायकवाड यांना देण्यात आले. याप्रसंगी मिलिंद सरतापे, ज्ञानेश्वर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. रस्ता रोकोला रिपाइं माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, जिल्ह्याचे नेते तुकाराम बाबर, भारत आठवले, पैलवान अशोकराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, ता उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे, युवक ता. सरचिटणीस प्रवीण साळवे, युवा तालुका उपाध्यक्ष बाबुराव भोसले, तालुका नेते ज्ञानेश्वर भोसले, वेळापुर युवक अध्यक्ष स्वप्नील सरवदे, वैभव पवार, नागनाथ भोसले, अनिल आठवले, महादेव सावंत, मसू चव्हाण महाळुंग  व परिसरातील  रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते व महिला भगिनी  रस्ता रोको  आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!