इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भरला बाल वैष्णवांचा मेळा
अश्वाचे गोल रिंगण देखील पार पडले

इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल ची बालदिंडी
श्रीपूर तालुका माळशिरस येथील इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी बाल दिंडी पालखी सोहळा काढून आनंद उत्सव साजरा केला. स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून बालदिंडी व संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काढून वारीतील आनंद घेतला.
अश्वाचे गोल रिंगण देखील पार पडले
आषाढी एकादशी निमित्त इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साजरा करण्यात आला. बाल वारकऱ्यांमुळे वैष्णवांचा मेळा भरल्याप्रमाणे शाळेला स्वरूप प्राप्त झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी ,ज्ञानोबा , तुकाराम, जनाबाई ,वासुदेव आणी मुक्ताबाई आशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. भक्तिमय वातावरणात हा सोहळा साजरा झाला. बालदिंडी, पालखी, वारकरी रिंगण, बाल वारकऱ्यांचे फुगड्या असे वारी मधील खेळ विद्यार्थ्यांनी खेळले. या बाल दिंडीत व पालखी सोहळ्यात विठू नामाचा जय घोष करत परिसर दुमदुमून गेला.
या बाल पालखी सोहळ्याचा शुभारंभ श्रीपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. सुधीर पोफळे, डॉ.आरती पोफळे, डॉ.सुहास बनसोडे. डॉ.बनसोडे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांच्या शुभ हस्ते पालखीची पूजा करून करण्यात आला. मिनी केजी ते दहावी पर्यंतच्या च्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल यांचा जयघोष केला. हा पालखी सोहळा शाळेचे सर्व शिक्षक, पालक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.