महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळावर प्रशांतराव परिचारक यांची नियुक्ती
महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी

निवड झाल्याचे समजताच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व अधिकारी, कामगार यांनी सोशल मीडियावरती केले अभिनंदन.
महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी
महाराष्ट्र राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळावर अशासकीय प्रतिनिधी पदावरती प्रशांतराव परिचारक यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या साखर कारखानदारी मधील ऊस दराचे विनियमन या संदर्भात साखर आयुक्त पुणे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता त्यामध्ये कर्मयोगी.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार प्रशांतराव प्रभाकर परिचारक यांची अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील दोन प्रतिनिधी, खाजगी कारखान्याचे दोन प्रतिनिधी व शेतकऱ्यांमधील पाच प्रतिनिधी यांची महाराष्ट्र शासन आदेश 12 जुलै 2023 च्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे.
सहकारी कारखान्यामधून प्रशांत परिचारक,कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि.श्रीपूर तालुका माळशिरस व कैलास तांबे संचालक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर अहमदनगर,यांची निवड करण्यात आली आहे. तसेच खाजगी साखर कारखान्यामधून दामोदर हरिभाऊ नवपुते, संचालक छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर व आनंदराव राऊत संचालक मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड जिल्हा नागपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच शेतकऱ्यांमधून सुहास पाटील तालुका माढा, सचिनकुमार शिवाजी नलावडे तालुका, पृथ्वीराज साहेबराव जाचक तालुका इंदापूर, धनंजय किसनराव भोसले तालुका औसा, योगेश माधवराव बर्डे तालुका दिंडोरी या पाच शेतकऱ्यांची प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
निवडीची बातमी समजताच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व अधिकारी, कामगार यांनी सोशल मीडिया वरती त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.