अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा बद्दल, न्याय मिळण्यासाठी माळशिरस तहसीलदारांना निवेदन
आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा

आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा
माळशिरस तालुक्यातील सोमवंशी क्षत्रिय कासार समाज माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे तहसीलदार माळशिरस यांना, मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल न्याय मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन मुलगी वय 17 वर्षे हिचा गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या याने मागील वर्षभरात अनेकवेळा छेडछाड करुन अखेर दि. 12-07-2023 रोजी नाहक बळी घेतला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को (बाल लैंगीक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाज यांच्याकडून निवेदनामध्ये करण्यात आले आहे तसेच तात्काळ नांदेड पोलिस अधिक्षक यांना आरोपी ज्ञानेश्वर पवार याच्यावर पोस्को (बाल लैंगीक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाज आंदोलन छेडतील व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन माळशिरस तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागाला पाठविण्यात यावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष भारत कोकीळ, उपाध्यक्ष नरहरी भस्मे, सचिव पद्माकर गंभीर, खजिनदार प्रमोद दादा वेळापुरे, सर्व गाडे परिवार, वेळापूर परिवार, महेश इटकर, गणेश कोकीळ, मांगले ढवन, अमोल तीवाटणे, प्रमोद दादा वेळापुरे, गाडे,सर्व समाज बांधव व इतर समाज बांधव उपस्थित होते.