सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती
सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या झाल्या बदल्या

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली, सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशिर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर – महाराष्ट्र राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या 41 बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.