महाळुंग-श्रीपूर मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
रक्तदान, व्याख्यान, शालेय साहित्य खाऊ वाटप, वृक्षारोपण करण्यात आले.

रक्तदान, व्याख्यान, शालेय साहित्य-खाऊ वाटप, वृक्षारोपण करण्यात आले.
महाळुंग-श्रीपूर तालुका माळशिरस येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण व पै.अशोक चव्हाण व त्यांच्या सर्व सहकार्यानी, गावामध्ये महादेव मंदिरासमोर लोकशाहीर-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी केली.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंग च्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अण्णाभाऊ साठे यांच्या वरचे विचार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. मिरे-महाळुंग रोड लगत वृक्षारोपण करण्यात आले. अकलूज येथील सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड, नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, पै.अशोक चव्हाण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साठे, लोखंडे मॅडम, भोसले मॅडम, अमृता चव्हाण, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक चव्हाण, खजिनदार अक्षय चव्हाण, दत्ता चव्हाण, रोहन चव्हाण, शिवाजी चव्हाण, राजकुमार चव्हाण, अमर चव्हाण, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, रेवन लोखंडे, महावीर चव्हाण, संजय चव्हाण, गणेश कोकीळ, पत्रकार तानाजी साठे, विठ्ठल चव्हाण, आदी उपस्थित होते.



