महाराष्ट्र

गाव करील ते राव काय करील | लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रु.

लवंग गावाचा, आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार

माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार*. *लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव*.

लवंग :  “गांव करील ते राव काय करील” या उक्तीचा प्रत्यय लवंग येथील गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे रुपच बदलून टाकले महाराष्ट्रातील गावांनी आदर्श घ्यावा अशा शैक्षणिक पर्वाला माळशिरस तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील लवंग येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक दत्तात्रय लोखंडे सर यांच्या प्रयत्नातून झाली आणि बघता बघता गावकऱ्यांनी या उठावाला भरभरून साथ देत दीड लाख रुपये किमतीचा कायापालट या शाळेत झाला आणि दीड लाख रुपयांचा रोख शैक्षणिक उठाव लवंगमध्ये घडून आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून शाळेत ९६ हजार रुपयांच्या १६ सायकली विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांनी दिल्या ७ हजार रुपयांच्या खुर्च्या,गुणवंत विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांची बक्षिसे,११ हजार रुपयांची शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके,शाळा सुशोभीकरणासाठी १० हजार रुपयांची लाल माती अशा प्रकारे गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून १ लाख ५२ हजार रुपयाचा शैक्षणिक उठाव घडविला.
या शैक्षणिक उठावाला सुरुवात युवक नेतृत्व सज्जन दुरापे यांनी ४१ हजार रुपये देऊन केली आणि त्याला साथ देत बिभिषण भोसले यांनी ४० हजार रुपये,निशांत दादा पाटील २५ हजार रुपये,प्रशांत पाटील १० हजार रुपये,मधुकर वाघ १० हजार रुपये,सदाशिव अवताडे ६ हजार रुपये आणि इतर काही मिळून १लाख ५२ हजार रुपये जमा झाले आणि या रकमेचा सदुपयोग करून गावकरी,शिक्षक,गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.हा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने निर्माण करावा.जिल्हा परिषद शाळेच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक साधन सामग्री गावकरी लवंगमधील ग्रामस्थ सध्या लोकवर्गणीतून भागवत आहेत. अशाच प्रकारे यापूर्वी वर्गणी पूरग्रस्तांना दिली आहे व रिलीफ फंडात लवंगच्या शाळेने गावकऱ्यांच्या मदतीने केली होती. या कामी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक दत्तात्रय लोखंडे यांनी निर्माण केलेल्या या आदर्शचे जिल्हाभर कौतुक होत असून त्यांच्या या शैक्षणिक उठावाची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!