महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामसभेत सारर्थीच्या उपक्रमाची माहिती

सारथीची उद्दिष्टे आणि रोजगार वाढीसाठी उपक्रम

अकलुज: माळशिरस तालुक्यातील गावपातळीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामसभेत सारर्थी व एमकेसीएलच्या मार्फत संगणक कोर्स मोफत प्रशिक्षण संदर्भात माहिती लोणकर कॉम्प्युटर, अकलूज मधील सारथीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामसभेत माहिती देण्यात आली. 

माळशिरस  तालुक्यांमधील अकलूज, यशवंतनगर, माळीनगर, संग्रामनगर, महाळुंग, श्रीपुर, खंडाळी, आनंदनगर, बागेचीवाडी, कोंडबावी, उंबरे, जांभूड, नेवरे, तांबवे, खळवे आदी गावांमध्ये सारर्थी व एमकेसीएलचे मोफत संगणक कोर्स या विषयाची माहिती देण्यात आली त्यावेळेस प्रत्येक गावातिल मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारर्थी) पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक २५ जून २०१८  रोजी कंपनी कायदा २०१३  च्या कलम ८  अन्वे स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे.  महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा -कुणबी व कुणबी-मराठा या लक्षीत गटातील समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे मराठा समाज्यासाठी सारथी मार्फत विविध योजना राबवल्या जातात 

सारथीची उद्दिष्टे आणि रोजगार वाढीसाठी उपक्रम

मराठा समाजासाठी सारर्थीच्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत संगणक कौशल्य मोफत प्रशिक्षण,  लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगार उद्योगता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करणे.  विद्यार्थी विद्वान उद्योजक शेतकरी आणि महिलांसाठी मार्गदर्शक आणि स्वयंदेशम केंद्र स्थापन करणे संस्था आणि विविध शिष्यवृत्ती फिलॉसिप विद्यावेतन अनुदान राबवणे या सर्व योजनाची ग्रामसभेत माहिती देण्यात आली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!