
बारावीची परीक्षा सुरू
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी, विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आहे. सदर केंद्रामध्ये दोन जूनियर कॉलेज मधील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. चालू वर्षी 392 विद्यार्थी सदर केंद्रावरती बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्राचा क्रमांक 453 आहे. परीक्षा केंद्रावरती दोन बैठे स्कॉड, शिक्षण विभागामधील 2 व महसूल खात्यांमधील 3 अशा बैठे पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. इमारतीच्या बाहेर पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि शाळेचे सेवक यांचा बंदोबस्त आहे. सदर परीक्षा 21 फेब्रुवारी ते 18 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्त देखील परीक्षा केंद्राच्या बाहेर दिलेला आहे. परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील नजर आहे. यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पी.आय. अरुण सुगावकर यांनी देखील सदर केंद्राला भेट देऊन कॉफी रोखण्यासाठी व बाहेरील त्रास रोखण्यासाठी सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरती जिल्हाधिकारी यांची बारीक नजर आहे. तशा प्रकारची भरारी पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत. सदर केंद्रावर केंद्र संचालक श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे व उपकेंद्र संचालक सुनील गवळी सर आणि टी एस आलदर सर आहेत. विद्यार्थ्यांना तपासूनच परीक्षा केंद्रामध्ये सोडण्यात आलेले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला लागणारे आवश्यक साहित्य सोडून, सर्व साहित्य इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आलेले होते. आजच्या पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर शांततेत पार पडला आहे.