नावारूपाला आलेला व्यवसाय, शॉर्टसर्किटमुळे जळून खाक | श्रीपूर मधील घटना
श्रीपूर मध्ये लाखो रुपयाचे आगी मुळे नुकसान

श्रीपूर मधील श्रीराम गिफ्ट हाऊसला आग | लाखो रुपये चे नुकसान
बारा लाख रुपयाचे नुकसान | एक दिवस अगोदर शालेय साहित्य भरले होते | आगी मुळे दुकान व सर्व साहित्य जळून झाले खाक
श्रीपूर तालुका माळशिरस : श्रीपूर, डी 19 रोड लगत श्रीराम गिफ्ट हाऊस आणि शालेय स्टेशनरी हाऊसला रविवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने बारा लाख रुपयांचे साहित्य व दुकान जळून खाक झाले आहे. अशी माहिती गिफ्ट हाऊसचे मालक रामचंद्र यशवंत चव्हाण यांनी पोलीस स्टेशन खबर मध्ये दिली आहे..
शाळा सुरू होणार असल्यामुळे व ट्युशन सुरू असल्यामुळे कालच मोठ्या प्रमाणात वह्या, पुस्तके, कंपास, पेन असे शालेय साहित्य दुकानांमध्ये भरले होते. गिफ्ट हाऊसच्या देखील मोठ्या वस्तू सदर दुकानांमध्ये होत्या. ,दुकानांमध्ये दोन मजली साहित्य ठेवलेले होते. दुकानांमध्ये कपाटे, फर्निचर होते.
रविवारी पहाटे दुकानाला आग लागल्याचे स्थानिक नागरिकानी, गिफ्ट हाऊसचे मालक रामचंद्र यशवंत चव्हाण यांना फोनवरून माहिती दिली. ताबडतोब घटनास्थळी येऊन पांडुरंग कारखान्याच्या अग्निशामकच्या साहाय्याने व स्थानिकांच्या, मित्रांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दुकानांमध्ये धुरांचे लोट, जळलेल्या वस्तू, वह्यापुस्तकांची राख मोठ्या प्रमाणात साठलेली आहे.
अतिशय हालाक्याच्या परिस्थिती मधून गेले अनेक वर्षापासून रामचंद्र चव्हाण यांनी श्रीपूर मध्ये हा व्यवसाय सुरू केलेला होता. नुकताच नावारूपाला आलेल्या व्यवसायाला, शॉर्टसर्किटमुळे दुकानातील साहित्य, दुकानातील फर्निचर, दुकान जळून खाक झाले आहे.
याबाबत अकलूज पोलीस स्टेशन, महाळुंग गाव कामगार तलाठी आणि महावितरण कंपनी श्रीपूर ऑफिसला सदर घटनेची खबर दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंदनशिवे करीत आहेत.