चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर श्रीपूर-महाळुंग व परिसरामध्ये झाला आनंदोत्सव साजरा
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्यात व आनंदनगर मध्ये झाला आनंदोत्सव साजरा

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्यात मोठ्या एलईडी वरती पाहिला सर्वांनी चंद्रयान मोहिमेचा ऐतिहासिक क्षण. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आनंदनगर मध्ये झाला आनंदोत्सव साजरा
श्रीपूर तालुका माळशिरस येथील आनंदनगर मध्ये चंद्रयानाचे यशस्वीरित्या बुधवार दिनांक 23/8/2023 रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यानाचे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर, चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून, ढोल ताशे वाजवत, देशभक्तीपर गीते लावून आणि गाऊन, सर्व आनंदनगर मध्ये मिठाईचे वाटप करून, लहान चमूनी व सर्वांनी केक कापून हा आनंद उत्सव साजरा केला..
आनंदनगर गणेशोत्सव मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आनंदनगर मधील रहिवाशी, लहान मुले, मुली यांनी वंदे मातरम गीत गाऊन, केक कापून हा आनंद उत्सव साजरा केला व सर्वांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी देखील मोठ्या एलइडी स्क्रीन वरती चंद्रयान मोहीम सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित शेतकरी भवन मध्ये पाहून, एका ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला. चंद्रयानाची मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्वांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले व भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण श्रीपूर-महाळुंग परिसरातील सर्वांनी पाहून शास्त्रज्ञाना शुभेच्छा दिल्या व देशप्रेम जागृत केले.