वेळापूर मध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात, मिरवणूक काढून साजरी
वेळापूर संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वेळापूर येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या आनंदात व दिमाखात साजरी करण्यात आली,
यावेळी पहिल्यांदाच वेळापूर मध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण वेळापूर शहरात हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रायचंद खाडे व आयोजकांनी महाप्रसादाचे आयोजन केले. याचा लाभ तीन हजार लोकांनी घेतला.संत निरंकारी मंडळ अकलूज शाखेच्या वतीने, वेळापूर येथे पुळुज येथील पांडुरंग ताटे महाराज यांचे प्रबोधन पर प्रवचन झाले.
“मन चंगा तो कटोथी में गंगा” हा संपूर्ण देशाला संदेश देणारे ते राष्ट्रीय संत होते .त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देण्याचे काम करतात. उत्तमरावजी जानकर यांच्या पाठपुराव्यातून संत रोहिदास महाराज सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण चर्मकार समाजाकडून त्यांचा भव्य सन्मान करण्यात येणार आहे.
हा जयंती उत्सव संपूर्ण समाजाने खांद्यावर घेतलेल्या जबाबदारीमुळे यशस्वीरित्या पार पडला हीच एकी येत्या काळामध्ये सर्व समाज बांधवांना ठेवावी लागणार आहे. जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष बंटी भगत, सचिव राहुल गायकवाड, कार्याध्यक्ष विनायक भगत ,मार्गदर्शक दत्तात्रय भगत, सतीश भगत ,भाऊसाहेब अहिरे, तानाजी लोखंडे, धनाजी लोखंडे, राजू आगवणे, रणजीत भगत, आबा भगत, आबा आगवणे, अविराज डोईफोडे यांच्या आयोजनात हा जयंतीचा कार्यक्रम पार पडला.