महाराष्ट्र

अकलूज, सत्यजित चव्हाण नॅशनल युथ ब्रिल्लीयन्स ॲवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

सत्यजित चव्हाण यांनी ग्रामीण भागातील अनेक समस्या सोडवण्याचा बहुमोल प्रयत्न

अकलूजच्या सत्यजित चव्हाण याचा नॅशनल युथ ब्रिल्लीयन्स ॲवॉर्ड पुरस्काराने सन्मानित.

अकलूज दि.२३ (केदार लोहकरे )
माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावचा सुपुत्र व अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील बी.ए.भाग २ मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी सत्यजित चव्हाण याला समाज सेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी नवी दिल्ली येथे खासदार व अभिनेते मनोज तिवारी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल युथ ब्रिल्लीयन्स अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्यजित बाळू चव्हाण याने महाविद्यालयात शिक्षणाबरोबर राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनाचे माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करित असल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून त्याची निवड करण्यात आली होती.नवी दिल्ली येथे कन्यादान फाऊंडेशन यांच्या वतीने नॅशनल युथ ब्रिल्लीयन्स ॲवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्यजित चव्हाण यांनी ग्रामीण भागातील अनेक समस्या सोडवण्याचा बहुमोल प्रयत्न केला असून अनेक युवकांना एकत्र घेऊन गावोगावी जाऊन विविध समस्यावर जनजागृती करण्याचे काम त्यांने केले आहे.यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,प्रौढ साक्षरता,बाल साक्षरता,व्यसनमुक्ती,महिला सक्षमीकरण,बचतगटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक प्रगती,तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती,सायबर क्राईमपासून बचाव,घरोघरी वृक्ष वाटप असे अनेक विषयांवर सत्यजित यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे.तसेच ग्रामीण भागामध्ये पारंपारिक वेशभूषांचा पेहराव करून पोतराज,वारकरी,वासुदेव यांची वेषभुषा करून ग्रामीण भागात जनजागृतीपर गाणी,ओव्या गाऊन वाद्य वाजवून लोकांच्या मनोरंजनाबरोबरच जनजागृती करत हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहे.
या वर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे सत्यजित चव्हाण यांने राष्ट्रीय प्रजासत्तकदिनी संचलन कर्तव्यपथ संचलन करून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय संघाचं सेकंड परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले आहे.
या सामाजिक कार्य व त्यांची आवड,उत्कृष्ट कामगिरी यासाठी त्यांला नवी दिल्ली येथे नॅशनल युथ ब्रिल्लियन्स अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या समाज प्रबोधनाचे काम करण्यासाठी त्याला वडील बाळू किसान चव्हाण व आई सौ.संगीता बाळू चव्हाण तसेच खंडाळी गावच्या ग्रामस्थ व अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,प्राचार्य डॉ.दत्तात्राय बागडे,राष्ट्रीय छात्र सेना कंपनी कमांडर लेफ्टनंट प्रा.नंदकुमार गायकवाड,वनस्पती शास्त्र प्रमुख डॉ.सविता सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!