गणेशोत्सवासाठी अकलूज पोलिसांकडून मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना
अकलूज, श्रीपूर पोलीस स्टेशन कडून मार्गदर्शक सूचना

अकलूज पोलीस स्टेशन कडून मार्गदर्शक सूचना
श्रीपूर : तालुका माळशिरस अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत महाळुंग-श्रीपूर, आऊट पोस्ट पोलीस ठाणे येते. पूर्व भागातील महाळुंग-श्रीपूर, बोरगाव, माळखांबी, जांभूड, नेवरे, कोंढारपट्टा, मिरे, उंबरे(वे) अशी लहान मोठे अनेक गावे येतात. येणाऱ्या 19 तारखेपासून सर्वत्र गणेश उत्सव साजरा केला जाणार. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखून, नियमांचे पालन करत करण्यात यावा. यासाठी मार्गदर्शक सूचना अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सुरवसे(कांबळे) मॅडम, व त्यांचे सहकारी पोलीस यांनी परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे, अध्यक्ष, सदस्यांची व गावातील पोलीस पाटलांची श्रीपूर गणेश हॉल येथे एकत्रित मीटिंग घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढील सूचनांचे काटेकोर पालन करावे.
1) परवानगी करीता ऑनलाइन अर्ज करावेत..
2) गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मा. धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांच्याकडे मंडळाची नोंद करणे आवश्यक आहे.
3) पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने व ठरवून दिलेल्या वेळेतच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी.
4) सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही बसावेत.
5) कोणत्याही जाती धर्माच्या, व्यक्तीच्या भावना दुखवतील असे देखावे, पोस्टर, बॅनर लावू नये.
6) गणेश मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. कार्यक्रम ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत.
7) ध्वनी प्रदूषण नियमाचे पालन करावे.
8) सर्व गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा.
9) गणेशोत्सव कालावधी मध्ये गणेश मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची राहील याची नोंद घ्यावी.
10) पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचे संरक्षण करणे करिता मंडपात फक्त पडदे न बसवता सुरक्षित पत्राशेडचा वापर करावा.
11) गणेश मंडळासाठी दहा दिवस लाईट घेण्याकरिता MSEB यांची रीतसर परवानगी घ्यावी व इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये याकरिता सर्वतोपरी काळजी घ्यावी.
12) वर्गणी जबरदस्तीने गोळा करु नये. वर्गणीसाठी कोणासही सक्ती करु नये.
13) मंडपामध्ये २४ तास एक स्वयंसेवक हजर ठेवावा व मंडपात १० दिवसाच्या काळात कोणीही अवैधकृती करु नये. व्हिजीट बुक ठेवावे.
14) देखाव्यामुळे सामाजिक ऐक्यास बाधा येणार नाही असे देखावे ठेवावेत. इ सुचना दिल्या.गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या.
गणेशोत्सवा दरम्यान रक्तदान शिबिर घेणे, वृक्षारोपण करणे, वीर माता पिता, वीर पत्नी, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांना आरतीला मान देणे, एक गाव एक गणपती उपक्रम, गाव स्वच्छता मोहीम राबविणे, वृद्धाश्रमांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, गरजू मुलांना वही-पुस्तक वाटप करणे, गावामध्ये मंडळामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, असे उपक्रम राबविण्यासाठी अवाहन या मीटिंगमधून करण्यात आले.