सुप्रियाताई सुळेंच्या माळशिरस दौऱ्याने तालुक्यातील कार्यकर्त्यां मिळाली ऊर्जा
माळशिरस येथे प्रदेश सरचिटणीस शंकरराव (नाना) देशमुख यांच्या नेतृत्वात खाली मेळावा संपन्न

कार्यकर्त्यांना केले अनमोल मार्गदर्शन
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा, मित्रपक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा माळशिरस मध्ये उत्साहात पार पडला, यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात व विकासाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुढील काळात कसे काम करावे याविषयीची मार्गदर्शन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मार्गदर्शनपर मेळावा माळशिरस येथे प्रदेश सरचिटणीस शंकरराव (नाना)देशमुख यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता, या प्रसंगी तालुक्याच्या वतीने उदयसिंह(आबा) माने देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, पक्ष निरीक्षक शेखरजी माने, प्रकाश बापू पाटील, प्रदेश अध्यक्ष उद्योग आघाडी नागेश फाटे, महेश माने, डॉ. रामदास भाऊ देशमुख, माजी सोलापूर जी. प. अध्यक्ष श्री फत्तेसिंह दादा माने पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे, माजी उपसभापती सौ.शुभांगीताई रामदास देशमुख, राष्ट्रवादीचे नेते रविंद्र भाऊ पाटील, काँगेस पक्षाचे अण्णासाहेब इनामदार, धैर्यशील भाऊ देशमुख, .रणजित बापू जाधव, पांडुरंग तात्या सालगुडे, युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, माजी जी.प.सदस्य बाळासाहेब धाईजे, आप्पासाहेब वाघमोडे वकील, राहुलआप्पा रेडे-पाटील, शिवसेनेचे .महादेवभाऊ बंडगर, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे किर्तिराजभैय्या देशमुख, .यशराजदादा देशमुख, मारुती रेडे-पाटील, मौलाचाचा पठाण, शिवाजी रेडे-पाटील, हणमंतराव साळुंखे, निझाम काझी, प्रदेश सचिव .तुकाराम साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस दयानंद पाटील, सरपंच अशोक दादा कदम, गजानन अण्णा माने-देशमुख,अब्दुलभाई शिकलकर, सयाजीराव गायकवाड, दत्तात्रय माडगूळकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.