गणेशोत्सवा निमित्त श्रीपूर मध्ये रक्तदान शिबिर संपन्न | Blood Donation Camp
शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर श्रीपूरच्या कार्यकर्त्यांनी राबविला उपक्रम

शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर श्रीपूरच्या कार्यकर्त्यांनी राबविला उपक्रम
79 रक्तदात्यांनी केले रक्तदान
श्रीपूर तालुका माळशिरस येथील शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर श्रीपूर सेक्शन 9 येथील कार्यकर्त्यांनी वायफळ खर्चाला बगल देत, गणेशोत्सवा निमित्त पंढरपूर येथील ब्लड बँकेला बोलावून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहीद निवृत्ती जाधव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दत्ता नाईकनवरे व उपस्थित मान्यवर, मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये फित कापून करण्यात आले. यावेळी 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी महिलांनी देखील आपला मोठा सहभाग नोंदविला.
गेल्या अनेक वर्षापासून शिवछत्रपती गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते शालेय विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ घेत असतात, समाज प्रबोधन पर व्याख्याने, वृक्षारोपण, अशा प्रकारचे वेगवेगळे समाज हिताचे उपक्रम प्रत्येक वर्षी गणेशोत्सवामध्ये आणि वर्षभर राबवीत असतात. अकलूज पोलीस स्टेशनकडून देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आव्हान गणेशोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या श्रीपूर येथील शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गणेश उत्सवामध्ये ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ आहे. म्हणून या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर राबविले. या शिबिराबद्दल परिसरातून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.