रत्नाईच्या कृषिकन्यांनी केले रांगोळीच्या माध्यातून ग्रामीण भागाचे सादरीकरण
कृषिकन्यांनी रांगोळीच्या माध्यातून ग्रामीण भागाचे सादरीकरण केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज तालुका माळशिरस येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी रांगोळीच्या माध्यातून ग्रामीण भागाचे सादरीकरण केले. रांगोळीद्वारे रेखाटलेल्या आराखड्यामध्ये लवंग गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन, वन स्रोत, जलस्रोत, पीक लागवड क्षेत्र, फळबागा, ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, विविध रस्ते तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखवण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कृषीकन्या उत्कर्षा फुले , अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, वैष्णवी सानप यांनी केले. या कार्यक्रमास रत्नाई कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम समन्वयक, प्रोग्राम ऑफिसर प्रा . एम . एम . चंदनकर आणि प्रा . एच . व्ही . कल्याणी, प्रा.एस.आर.आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी लवंग येथील मा. सरपंच उत्तम भिल्लारे, मा. उपसरपंच मधुकर वाघ, संचालक धनाजी चव्हाण ( सहकार महर्षी कारखाना), विक्रम भोसले ( पोलीस पाटील), मोहन मिटकल ( ग्रामविकास अधिकारी, लवंग), डॉ. जाधव (प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंग), बापू खंडागळे ( ग्रामपंचायत क्लर्क) आदि मान्यवर उपस्थित होते.