“स्वच्छ भारत, स्वस्थ भारत,श्रेष्ठ भारत” रत्नाई च्या कृषिकन्यांनी दिला संदेश
लवंग गावात एक तास श्रमदान

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज तालुका माळशिरस येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी रविवारी (दि.१ ऑक्टोबर) श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्रमदान मोहिमेअंतर्गत लवंग गावात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार लवंग गावात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे दृश्य परिणाम आज पहावयास मिळाले. लवंग गावात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजार, बस स्थानक, ग्रामपंचायत परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा करण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड ठिकाणी नेण्यात आला. तसेच सर्वत्र नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.श्रमदान ही एक चळवळ म्हणून सर्वांनी कायम ठेवली पाहिजे. सर्वांनी मिळून पृथ्वी, जल, वायू स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबत सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.आले.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कृषीकन्या उत्कर्षा फुले , अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, वैष्णवी सानप यांनी केले. या कार्यक्रमास रत्नाई कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे कार्यक्रम समन्वयक, प्रोग्राम ऑफिसर प्रा . एम . एम . चंदनकर आणि प्रा . एच . व्ही . कल्याणी, प्रा.एस.आर.आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी लवंग येथील मा. सरपंच उत्तम भिल्लारे, मा. उपसरपंच मधुकर वाघ, संचालक धनाजी चव्हाण ( सहकार महर्षी कारखाना), विक्रम भोसले ( पोलीस पाटील), मोहन मिटकल ( ग्रामविकास अधिकारी, लवंग), डॉ. जाधव (प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंग), बापू खंडागळे ( ग्रामपंचायत क्लर्क) आदि मान्यवर उपस्थित होते.