श्रीपूर-महाळुंग आरोग्यवर्धिनी केंद्राला मिळाले नवीन वैद्यकीय अधिकारी
डॉ.सचेतन घोडके श्रीपूर-महाळुंग आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून झाले रुजू

डॉ.सचेतन घोडके, MBBS श्रीपूर-महाळुंग आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून झाले रुजू
श्रीपूर तालुका माळशिरस उजनी कॉलनी श्रीपूर-महाळुंग येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला तीन आरोग्य अधिकाऱ्याची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. समीर शेख यांची बदली झाल्यानंतर, सातारा येथून डॉ.सचेतन घोडके एमबीबीएस, डॉ. मेघा कदम व डॉ. भारत गायकवाड या तीन वैद्यकीय अधिकार्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.
नवीन वैद्यकीय अधिकारी डॉ.सचेतन घोडके यांचा नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुप्रिया जगताप, महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मेघा कदम, डॉ. भारत गायकवाड, आरोग्य सहाय्यिका फरीदा पठाण, औषध निर्माण अधिकारी सुजित फुले, कनिष्ठ लिपिक दत्ता गवळी, आरोग्य सहाय्यक दीपक चव्हाण, आरोग्य सेवक सलीम तांबोळी, आरोग्य सेविका विद्या वाघमारे, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
कोट्यावधी रुपये खर्च करून उजनी कॉलनी येथील महाळुंग श्रीपुर आरोग्यवर्धिनी केंद्र सुसज्ज अवस्थेत आहे आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आत्याधुनिक पद्धतीने या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत.