यमाईदेवी मंदिर महाळुंगचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद – खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर
यमाईदेवी मंदिर महाळुंग मध्ये खासदार आमदारांच्या शुभहस्ते झाली महापूजा.

महाळुंग तालुका माळशिरस येथील यमाईदेवी मंदिर परिसराची गेले अनेक वर्षापासून पडझड झालेली होती. याबाबत सर्व भाविक भक्तांची ग्रामस्थांची अनेक वर्षापासून नाराजी होती. स्थानिक ग्रामस्थ, काही आजी माजी लोकप्रतिनिधी, यमाईदेवीमाता प्रतिष्ठानच्या सदस्यांनी, वेगवेगळ्या माध्यमांनी गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भातले प्रश्न शासन दरबारी मांडले होते. पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात मंदिर असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या.
स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे सोडले नव्हते, दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना, काही गावकरी माढा लोकसभेचे खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिल्ली येथे भेटून निवेदन दिले होते. तात्काळ प्रतिसाद देत, केंद्रीय पुरातत्त्व मंत्री रामकृष्ण रेड्डी यांच्यासोबत गावकऱ्यांची व एका शिष्टमंडळाची बैठक लावून तात्काळ संबंधित ऑफिसला आदेश करून एक कोटी रुपये निधी देण्याचे आदेश करण्यात आले. पंधरा दिवसांनी मंदिर परिसरात काम सुरू झाले. हा प्रश्न मार्गी लागल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे, असे आपल्या मनोगतातून खासदार निंबाळकर यांनी मत व्यक्त केले.
नवरात्र उत्सवानिमित्त खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, या सर्वांच्या शुभहस्ते सपत्नीक यमाई देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी रावसाहेब सावंत-पाटील व नगरसेविका जोस्ना सावंत -पाटील यांनी देवीला सुवर्णालंकार अर्पण केले.
महाळुंग येथिल यमाई देवी मंदीर जीर्णोध्दार, भारत सरकारच्या ग्राहक व्यापार विभागाच्या वतीने दिवाळीसाठी ६० रु. किलो दराने नागरिकांना हरभरा डाळ वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंचावर खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माढ्याचे आ.बबनराव शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, नगरध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, माळीनगर साखर कारखान्याचे रंजनभाऊ गिरमे, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे गट नेते राहूल रेडे-पाटील, नगरसेवक नामदेव इंगळे, चेअरमन राजेंद्र वाळेकर, नगरसेविका शारदा पाटील, नगरसेविका सविता रेडे, नगरसेविका तेजश्री लाटे, ज्योती रेडे, पैलवान अशोक चव्हाण, नामदेव पाटील, विक्रमसिंह लाटे, शिवाजी रेडे-पाटील, पुजारी रामचंद्र गुरव सर, स्थानिक ग्रामस्थ, भाविक भक्त, वेगवेगळ्या शासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मौला पठाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले.
आमदारबबन दादा शिंदे म्हणाले, “ज्यांनी माझ्याकडे विकास निधीची मागणी केली आहे. त्यांना मी भरघोस निधी दिला आहे. काही कामे सुरू आहेत, सत्ताधारी आणि विरोधक असा मी भेदभाव करत नाही माझ्याकडे सर्व नगरसेवकांनी विकास कामासाठी निधीची मागणी केल्यास मी निधी कमी पडू देणार नाही. नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांच्या प्रभागासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्या महिलांच्या हातावर परडी आहे, त्यांना तुळजापूरला दर्शनासाठी घेऊन जाणार आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले.