महाराष्ट्र

अकलुज पोलिसांची धडाकेबाज कारवाई | तब्बल ८ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त

महिला बचत गटाची ८.७५ लाखांची रोख रक्कम मध्यप्रदेशातून जप्त

अकलुज | महिला बचत गटासाठी आयसीआयसी बँकेतून काढलेली तब्बल ८ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजारांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. अकलुज पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत मध्यप्रदेशातून ही संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.

घटना कशी घडली?

२९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी फिर्यादी महिला आयसीआयसी बँक, अकलुज येथून बचत गटासाठी रक्कम घेऊन बाहेर पडल्या. त्यांची स्कुटी सुरू न झाल्याने त्या व त्यांचे पती बाजूला उभे होते. दरम्यान पैशांची बॅग गाडीला आडकवून ठेवली असता अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅग पळवली. या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गुरनंबर ५८३/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांची तात्काळ हालचाल

गुन्हा नोंद होताच अकलुज पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व उपविभागीय पथक सक्रिय झाले. नगरपरिषद व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची माहिती गोळा करण्यात आली. सायबर शाखेच्या मदतीने आरोपीचा माग काढला असता तो मध्यप्रदेशातील कडीया सांसी पचोर, जिल्हा राजगड येथे गेल्याचे समोर आले.

मध्यप्रदेशात संयुक्त कारवाई

सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी राजगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अमित तोलानी यांच्याशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेतली. छाप्यात आरोपी पसार झाला, मात्र नातेवाईकांकडून माहिती मिळाल्याने घरातून चोरीची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.

महिलांसाठी दिलासा

महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांना वाटपासाठी ठेवलेली रक्कम सुरक्षित परत मिळाल्याने सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या तत्परतेचे व तांत्रिक तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

या कारवाईत मोलाचे योगदान

या धडाकेबाज कारवाईत सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांचे मार्गदर्शन होते.
विशेष तपास पथकातील निकम, पोना दत्ता खरात, पोना राकेश लोहार, शिवकुमार मदभावी (अकलुज पोलीस ठाणे), जुबेर तांबोळी (सायबर शाखा) यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम घाटगे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!