अंगणवाडी मधील लहान मुलांच्या स्पर्धा | फनी गेम, क्रीडा स्पर्धा व नृत्य स्पर्धा संपन्न | Vikram Late Birthday
विक्रमसिंह लाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सामाजिक कार्यकर्ते विक्रमसिंह लाटे यांचा वाढदिवस महाळुंग-श्रीपूर मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील विक्रमसिंह आगतराव लाटे यांचा वाढदिवस त्यांच्या पत्नी नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने महाळुंग केंद्रात कार्यरत असणाऱ्या सर्व अंगणवाडी मधील लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा, फनी गेम व नृत्य स्पर्धा श्रीपूर उजनी कॉलनी येथील तयार केलेल्या भव्य मैदानामध्ये घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाळुंग-श्रीपूरच्या नगराध्यक्षा मॅडम लक्ष्मी अशोक चव्हाण व शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या सचिव सारिका दत्तात्रय नाईकनवरे मॅडम यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी नगरसेवक, गटनेते राहुल कुंडलिक रेडे, नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, नगरसेविका तेजश्री लाटे, पैलवान अशोक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मौलाचाचा पठाण, पत्रकार दत्ता नाईकनवरे, बाळासाहेब भोसले, विक्रमसिंह लाटे, दादासाहेब लाटे, बाबासाहेब वगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहभाग घेतलेल्या व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पारितोषक देण्यात आले . तसेच सर्व विद्यार्थी, पालक व अंगणवाडी सेविकांना खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयसिंह लाटे, कुमार ताकतोडे, विपिन वगरे, आनिष कुलकर्णी,अक्षय कुलकर्णी, सचिन दुपडे, दादा पाटेकर, रवी लोंढे,धिरज गाडे, व महाळुंग अंगणवाडी केंद्रातील सर्व अंगणवाडीसेविका, मदतनीस, सर्व आशा सेविका व मदतनीस, विद्यार्थ्यांचे पालक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले.