ग्रामपंचायत मध्ये सारथी योजनेची माहिती
सारथी व एमकेसीएल याच्या मार्फत निशुल्क संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण लोणकर कॉम्प्युटर अकलूज, माळीनगर

माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम
श्रीपूर: माळशिरस तालुक्यामध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) व एमकेसीएल याच्या मार्फत निशुल्क संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण लोणकर कॉम्प्युटर अकलूज माळीनगर येथे देण्यात येत आहे त्याची माहिती तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्तादीनी देण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) ही मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी औचित्य साधून ग्रामपंचायत येथे सारथी संस्थेमार्फत विविध योजनांची माहिती सारथीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी दिली. महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायत संस्थांवर सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था , पुणे) च्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार ग्रामस्थांपर्यंत, पालकवर्ग व विद्यार्थीवर्ग यांच्यापर्यंत व्हावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
माळशिरस तालुक्यामधील महाळुंग, श्रीपूर, शंकरनगर, गिरजणी, आनंदनगर, या ग्रामपंचायतीमध्ये सारथी व एमकेसीएलच्या योजनेची माहिती देण्यात आली त्यावेळी शंकरनगर ग्रामपंचायत मध्ये मदनसिंह मोहिते-पाटील, सरपंच वर्षाताई सरतापे, सदस्य अशोक शिंदे, आशाबाई पाटोळे मिरा अलगुडे, हिराबाई गोडसे, सविता कदम, ग्रामसेवक बी. पी नवले, महाळुंग नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, मंडलधिकारी वि. टी लोखंडे, गिरजणी ग्रामपंचायत मध्ये सरपंच गंगुबाई साठे. उपसरपंच राणी माने. सदस्य जया पालकर, मयूर माने, ग्रामसेवक सावंत, आनंदनगर ग्रामपंचायत मध्ये सरपंच रवींद्र लोंढे, उपसरपंच गंगाधर चव्हाण, बाळू काटकर, सदस्य पांडुरंग पवार, ग्रामसेवक एन. बी शेलार आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये लोणकर कॉम्प्युटर मधील दिव्या चव्हाण, ऋतुजा शिंदे, निकिता पवा,र संदीप भोसले, हर्षद गाडगे आदी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सारथी व एमकेसीएल राबवणाऱ्या कॉम्प्युटर कोर्सची निशुल्क कॉम्प्युटर कोर्स राबवण्याची माहिती देण्यात आली हा उपक्रम लोणकर कॉम्प्युटर अकलूज माळीनगर या सेंटरने राबवण्यात येत आहे.