पांडुरंग कारखान्याचा 33 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
राहिलेली रक्कम 151 रुपये प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज वर्ग

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन 2023 -24 च्या 33 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन 2023 -24 च्या 33 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक , सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे साहेब (l.P.S) पोलीस अधीक्षक सोलापूर, व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कारखान्यामध्ये बॉयलरचे अग्निप्रतीपादन करून सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व यमाई देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.
आपले मनोगत व्यक्त करताना चेअरमन प्रशांतराव परिचारक म्हणाले, ”सध्या दुष्काळाचा सावट आहे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने एक्सपान्शन केले आहे. अचूक नियोजन असल्यामुळे शेतकरी, कामगार आणि सभासदाच्या सहकार्याने हा कारखाना यशस्वीरित्या सुरू आहे. आपण फायनल दर 2751 रुपये दिलेला आहे. त्यातील राहिलेली रक्कम 151 रुपये प्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज वर्ग करण्यात आलेली आहे. कारखाना जास्तीत जास्त दिवस चालणे आवश्यक आहे. आपल्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी, आपल्या गावातील इतर शेतकरी मित्रांनी राजकारणाचा भाग सोडून शेतकरी जगवण्यासाठी आपल्या कारखान्याकडे जास्तीत जास्त आपल्या शेजारच्या शेतकऱ्याचा ऊस गाळपासाठी आणण्याचा प्रयत्न करावा.” असे आवाहन मनोगत व्यक्त करताना प्रशांतराव परिचारक यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी कारखान्याचे व कारखाना अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे. त्या बद्दल घ्यावयाची दक्षता याबद्दलची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली. पोलीस स्मृती दिनानिमित्त सर्वांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मंचावर उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, प्रणव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हनुमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव, सर्व सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पोफळे यांनी केले.