पांडुरंग कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत जमा
96 रु. लाख रुपये ठेवीदाराच्या बँक खात्यावर वर्ग

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत वर्ग केल्याची माहिती चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम कारखाना प्रत्येक वर्षी देत असतो. कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमा असणाऱ्या सुमारे 12 कोटी ठेवीवर द.सा.द.शे. 8% प्रमाणे र. रु. 96 लाख रुपये ठेवीदाराच्या विविध बँकेमधील खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली योवळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असून सोलापूर जिल्हात सातत्याने सर्वाधिक ऊसदर दिलेला आहे. आदरणीय मोठया मालकांचा आदर्श घेवून कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक वर्षी व्याज बिल दिले जात असून यावर्षीही ठेवीदारांना व्याज बील दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या बँकाकडून ठेवीवर 5 ते 6 टक्के इतके व्याज दिले जाते. परंतू कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून बँकांच्या व्याजापेक्षाही ज्यादा म्हणजेच 8 टक्के इतका व्याजदर ठेवीदारांना दिला आहे. कारखाना गळीत हंगाम 2023-24 मध्ये उच्चांकी गाळप क्षमतेने सुरु असून या हंगामात 11 लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उदिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे. कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन 9000 मे.टन गाळप करणार असून कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प 90 के. एल. पी. डी. क्षमतेने व्यवस्थीतपणे सुरु आहे, को-जनरेशनही सुरळीत सुरु असून त्यामधूनही जास्तीत जास्त विज एक्स्पोर्ट करीत आहोत.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सागीतले की कारखान्याचा गाळप हंगाम 2023-24 हा वाढीव गाळप क्षमतेने चालवित आहोत. चालू गळीत हंगाम मा. चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खूळे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना इतिहासातील सर्वोच्च गाळप क्षमतेने सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे,विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.