आकाश कंदील बनविल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला – जि.प.प्रा.शाळा चोरमले-पवारवस्ती
रंगीबेरंगी आकाश कंदील विद्यार्थ्यांनी बनवले

लहान हाताने बनवले दिवाळीसाठी शुभेच्छा देणारे भेटकार्ड,
श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरमले-पवार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आकाश कंदील बनवून दिवाळी सण साजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावरती स्वतः आकाश कंदील बनविल्याचा आनंद दिसून येत होता. नेहमीच विद्यार्थ्यांकरीत नवनवीन उपक्रम राबविणारी ही जिल्हा परिषद शाळा.
जिल्हा परिषद प्राथमिक चोरमले पवार वस्ती शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या चिमुकल्या हाताने दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास असे भेटकार्ड व आपल्या हातांना वळण देत अतिशय सुंदर असे आकाश कंदील बनवले. यामध्ये विद्यार्थ्यांना सहकारी शिक्षका दि.शा. तापोळे मॅडम, उप मुख्याध्यापक दि.स. तांबोळी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थाने आकाश कंदील पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



