पांडुरंग कारखान्याचा पहिला हप्ता 2800 रुपये जाहीर | PSSK | Shreepur
जिल्ह्यातील सर्वांचे होते ऊस दर पहिल्या हप्त्याकडे लक्ष

1 मार्च 2024 पासून पुढे उशिराने येणाऱ्या ऊसास 150 रु. ज्यादा धरून 2950 रु. इतका पहिला हप्ता देण्यात येणार
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता 2800 रुपये देणार असल्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी वाखरी येथे कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाहीर केले.
देशांमध्ये सर्वोत्कृष्ट असणारा कारखाना म्हणून नावाजलेल्या या कारखान्याच्या दराकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष होते. सर्वच बाबतीत आघाडीवर असणाऱ्या कारखान्याने हा सर्वाधिक दर जाहीर केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना सध्या तरी सर्वाधिक दर मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी मार्च नंतर ऊस गाळप करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी ज्यादा दर देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने, चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक यांच्या उत्कृष्ट नियोजनाने कारखाना नेहमीच सर्व बाबतीत प्रगतीपथावर राहीलेला आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना प्रत्येक गळीत हंगामात जास्तीत जास्त दर देण्याचा नेहमीच प्रयत्न अखंडपणे सुरू ठेवला आहे..
असा असेल दराचा तक्ता
1 मार्चपासून पुढे उशिराने येणाऱ्या ऊसास 150 रु. ज्यादा धरून 2950 रु. इतका पहिला हप्ता देण्यात येणार .
1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी पर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या ऊसास 100 रु. प्रति मॅट्रिक टन आगाऊ धरून 2900 रु. पहिला हप्ता देण्यात येणार.
16 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत उशिराने येणाऱ्या ऊसास आगाऊ 50 रु. प्रति मॅट्रिक टन धरून 2850 रु. इतका पहिला हप्ता देण्यात येणार.
आता सुरू असलेल्या ऊस गाळपास 2800 रु. इतका पहिला हप्ता देण्यात येणार.