महाळुंग-श्रीपूर मध्ये अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सोलापूर अधीक्षकांना निवेदन
सोलापूर एसपी यांना नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी दिले निवेदन

नुसत्या तात्पुरत्या, कारवाया नको, कायमस्वरूपी अवैद्य धंदे बंद करा नागरिकांमधील सूर
महाळुंग-श्रीपूर हद्दीमध्ये संपूर्ण गावात बेकायदा दारू विक्री व अवैध्य धंदे बंद करा
श्रीपूर तालुका माळशिरस येथील नवनिर्मित नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, नगरसेविका तेजश्री विक्रमसिंह लाटे, नगरसेविका ज्योत्स्ना रावसाहेब सावंत-पाटील व इतर सहकाऱ्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे. सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव क्रमांक 11/2023 मंजूर करण्यात आला आहे. गावामध्ये व महाळुंग-श्रीपूर हद्दीमध्ये बेकायदा विक्री केली जाणारी दारू, केमिकल मिश्रित ताडी(शिंदी), जुगार, मटका, गुटखा, गांजा, ऑनलाइन लॉटरी, ऑनलाईन मटका असे अनेक अवैद्य धंदे नगरपंचायत हद्दीमध्ये गेले अनेक वर्षापासून. सुरू आहेत. लहान मोठ्या हॉटेल ढाब्यामध्ये सुद्धा बेकायदा दारू विक्री सुरू आहे, पाठीमागच्या बाजूला मटका सुरू आहे. हे सर्वत्र चित्र पाहावयास मिळत आहे.
यामुळे गावातील अनेक नवयुवक व्यसनाधीनकडे वळले आहेत. त्यामुळे अनेकांचे घर प्रपंच बिघडले आहेत. गावांमध्ये काही ठिकाणी अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यसनातून युवक कर्जबाजारी बनवू लागले आहेत. मागील आठवड्यात दारूच्या व्यसनाने दोघांनी महाळुंग मध्ये आपला प्राण गमावला आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांना संपूर्ण गावामध्ये बेकायदा दारू व अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. याबाबतीत पोलिसांनी दुर्लक्ष केल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन व उपोषण केले जाणार आहे असे नगराध्यक्ष मॅडम यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. परिसरातील पिढीत कुटुंबांनी व महिला भगिनींनी, या निर्णयाचे स्वागत करून नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांचे कौतुक केले आहे.
सदर अवैध धंदे बंद करण्यासाठी खरी साथ आवश्यक असते ती पोलीस प्रशासनाची, परंतु गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी दिल्या असता, तात्पुरत्या एक-दोन कारवाया होतात व नंतर दोन दिवसांनी अवैद्य धंदेवाले खुलेआम आपली दुकाने परत जोमाने मांडून बसत आहेत, असे चित्र मागील काही वर्षात सर्वांना पाहावयास मिळत आहे. तरी पोलिसांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करून, गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी, कायमस्वरूपी प्रयत्न करावेत असे नागरिकांमधून सूर उमटत आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या भागांमध्ये अवैद्य धंदे सुरू आहेत तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, संबंधित पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चालू असणारे अवैध धंदे सुरू असल्यास तेथील अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या निर्णयाचे कितपत पालन होणार आहे?, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे.