
पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ते राजापूर येथील पत्रकार होते. त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. तसेच पत्रकार संघटना यांनी देखील याचा निषेध केला होता. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आज शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबाला राज्यसरकारने मदतीची घोषणा केली आहे.
संशयित आरोपी या प्रकरणातील पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे. शशिकांत वारीशे कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला असून अखेर आज या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख, अशी एकूण 25 लाखाची मदत जाहीर केली आहे. तर शिक्षण घेत असलेल्या शशिकांत वारीशे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत महिती दिली.