जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी भरवला आठवडे बाजार | जि.प.शाळा चोरमले-पवार वस्ती
विद्यार्थी व पालकांचा उत्साहून, शाळेचे केले पालकांनी कौतुक

श्रीपूर तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद चोरमले पवार वस्ती हे बोंडले केंद्र व उघडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी द्विशिक्षकी शाळा आहे. या शाळेमध्ये सर्वच उपक्रम अतिशय छान व नेटक्या नियोजनामध्ये पार पडतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे आठवडा बाजार. विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांना आनंद मिळावा, तसेच मनोरंजनातून शिक्षण व्हावे, भाज्यांची माहिती व्हावी, बाजार कसा असतो याचे ज्ञान व्हावे, बाजारातील वस्तूंच्या किमती माहिती व्हाव्या, वस्तूंचे वजन करून किलोग्रॅम ग्रॅम मध्ये कसे द्यायचे हे माहित व्हावे आणि त्याचे किती पैसे घ्यायचे हे हे विद्यार्थ्यांना कळावे या सर्व उद्देशाने शाळेतील शिक्षकांनी आठवडा बाजार हा उपक्रम घेण्यात आला.
बाजारासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानेतयारी केली. तसेच सर्व पालकांनीही आपल्या पाल्यांना बाजारामध्ये कोण कोणते साहित्य घ्यायचे त्यासाठी सहकार्य केले.शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. तसेच वस्तूंची खरेदी विक्री करताना वजन मापे पाहून पैशांचा व्यवहार ही अतिशय चोख पद्धतीने केला.
या उपक्रमासाठी पालक वर्गातून प्रचंड उत्साह दिसून आला. तसेच पालकांना हा उपक्रम खूपच मनापासून आवडला. असा उपक्रम दर आठवड्यातून किंवा दर महिन्यातून एकदा तरी घ्यावा असे मनोगत पालकांनी व्यक्त केले बऱ्याच महिला आपल्या लहान लहान बाळांना कडेवर घेऊन बाजार करण्यासाठी आल्या होत्या. बाजारामध्ये विद्यार्थिनींनी आणलेली भेळ,पोहे व चहा यांचाही आस्वाद सर्व पालकवर्ग व ग्रामस्थ यांनी घेतला.
बाजारासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ चोरमले, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक वर्ग बंधू भगिनी, तसेच ज्येष्ठ कनिष्ठ सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून बाजारामध्ये खरेदी केली.हा बाजार यशस्वीपणे पार पडावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबोळी सर व उपशिक्षिका श्रीम. तापोळे -टकले मॅडम यांनी नियोजन केले.