महाराष्ट्र

सहलीवरून परतताना घर-शाळा जवळ आल्यावर सहलीच्या बसला अपघात | Accident | शिक्षक जागेवर ठार

एक शिक्षक जागेवर ठार, दोन शिक्षक व दोन विद्यार्थी जखमी

घर आणि शाळा आले होते काही  मिनिटांच्या अंतरावर. सहलीवरून परतताना सहलीच्या बसला अपघात, एक शिक्षक जागेवर ठार, दोन शिक्षक व दोन विद्यार्थी जखमी

अकलूज : कोकण दर्शनासाठी गेलेल्या शालेय सहलीच्या बसला अकलूज-माळशिरस रोडवरील वटपळी कॉर्नरवर झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागेवरच मृत्यु झाला तर दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

शिवाजी विद्यालय, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे या शाळेची सहल कोकण दर्शनासाठी दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री रवाना झाली. पुणे जिल्ह्यातील या शाळेने अकलूज बस आगाराकडून तीन बस सहलीसाठी प्रासंगिक करारावर घेतल्या होत्या. दि. १९ ते २१ डिसेंबर असा सहलीचा कालावधी होता. सहलीसाठी सदर बसमध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक होते. सहल संपवुन बस दि. २१ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता माळशिरस तालुक्यातील वटपळी या गावाजवळ आल्या. गावाजवळील एका धोकादायक वळणावर बांबु घेऊन निघालेला एक आयशर ट्रक (एम एच ०९ एप एल ३३९८) पंक्चर झाल्यामुळे वळणात रस्त्यावर उभा होता. वळन घेत असताना बस ड्रायव्हरला (बस क्र. एम एच १४ बी टी ४७०१) ट्रकचा अंदाज आला नाही. ट्रकला साईड मारून बस पुढे काढत असताना पुढुन एक चार चाकी वाहन आडवे आल्याने बसने ट्रकला पाठीमागुन धडक दिली. बस वेगात असल्याने कंडक्टर साईड पुर्णपणे फाटुन निघाली. यावेळी पुढे बसलेले शिक्षक बाळकृष्ण हरीभाऊ काळे हे जबर जखमी होऊन जागेवर मयत झाले. तर विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी शेटे वय १२ वर्षे, विद्यार्थी श्रवण घाडगे वय ११ वर्षे, शिक्षिका कवडे एस. एस. व शिरसाठ आर. एस. हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातानंतर आयशर ट्रक व ड्रायव्हरला अकलूज पोलीसांनी ताब्यात घेतले. तर बस अकलूज आगारात उभी करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता विवेक लोंढे व विभागीय वाहतुक अधिकारी अजय पाटील यांनी अपघातग्रस्त बस व घटनास्थळाची पाहणी केली असल्याची माहिती अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!