महाराष्ट्र

पोरींनो तुमच्यावर बापाचे प्रेम सर्वाधिक असते, त्याची मान खाली जाणारे काम करू नका-वसंत हंकारे

दोन मार्क कमी पडू द्या, पण आपले चारित्र्य जपा- वसंत हंकारे

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षक पालक संघाने शाळेच्या विद्यार्थिनी, विद्यार्थी व पालकांसाठी परिवर्तन करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सांगली यांचे प्रबोधनाच्या ही पुढे जाऊन परिवर्तनाची आवश्यकता आहे.  ‘बाप समजून घेताना, संघर्षातून यशाकडे’ या विषयाचे व्याख्यान श्री गणेश हॉल श्रीपूर मध्ये पार पडले. त्यावेळी बोलताना हंकारे यांनी विद्यार्थिनीनो दोन टक्के गुण कमी पडू द्या, पण आई-वडिलांची मान खाली जाणारे कोणतेही काम करू नका, आपले चारित्र्य जपा, बापाचे प्रेम हे, चिरकाल कायमस्वरुपी असते, बापा एवढे प्रेम तुमच्यावर दुसरा कोणीही करू शकत नाही. सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे. यामुळे आपल्या मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. चौकाचौकांनी शाळा, क्लासेस, कॉलेज समोर टवाळखोर रोड रोमिओ मुलींचा पाठलाग करत असताना आपण नेहमी पाहतो आणि म्हणूनच यावर एकमेव उपाय म्हणजे आपल्या मुलींचे व पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येणार नाही. अशी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. 

कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष क.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी,  शाळेचे संस्थापक डॉ.रामदास देशमुख,  महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, राजभैया देशमुख, प्राचार्य पांडुरंग बनसोडे या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेविका शारदा पाटील, नगरसेविका तेजश्री लाटे, नगरसेविका नाझिया पठाण,  विक्रमसिंह लाटे, मौला पठाण, नामदेव पाटील, पै.अशोक चव्हाण, राजेंद्र वाळेकर, पांडुरंग कारखान्याचे सर्व अधिकारी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दत्ता नाईकनवरे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय दोरगे, सहसचिव बाळासाहेब भोसले, आसिफ शेख, लखन धुमाळ, रामचंद्र चव्हाण, विशाल घालमे, अरविंद साठे, सुवर्णा रेडे-पाटील, रेशमा लोखंडे, पुनम जाधव, संजय मार्डीकर, गणेश कचरे, इब्राहिम शेख, सर्व पालक संघाचे सदस्य, शाळा कॉलेजचे सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!