महाराष्ट्र
वेळापूर | राहुल साठे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित

वेळापूर तालुका माळशिरस येथील नेहमी समाज कार्यामध्ये सक्रिय असणारे व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे, हालाक्याच्या परिस्थितीमधून उच्च शिक्षण घेऊन आरोग्य सेवा करत असणारे राहुल वसंत साठे यांना स्व. हरिश्चंद्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय स्नेहबंध समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..!
पुणे येथील समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे आणि जात पडताळणी अधिकारी सचिन कवले साहेब यांच्या शुभ हस्ते सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राहुल साठे यांचा सपत्नीक सत्कार देखील करण्यात आला. यावेळी फाउंडेशन संस्थापक कृष्णा गायकवाड सर, उपाध्यक्ष शफीक शेख सर , संस्थापिका मनीषा गायकवाड मॅडम, आबासाहेब कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते