बेस्ट चीफ अकॏटंट पुरस्कार रवींद्र काकडे यांना जाहीर
राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कार विजेता असणारा कारखाना

बेस्ट चीफ अकॏटंट पुरस्काराचे विजेते ठरले रवींद्र काकडे
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने सन २०२३-२४ सालामध्ये देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चेअरमन प्रशांतराव परिचारक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने व श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने कारखाना नेहमीच देशपातळीवर आपले नावलौकिक करण्यात अग्रेसर ठरलेला आहे. अनेक पुरस्काराने हा कारखाना, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी सन्मानित झालेले आहेत. सन २०२३-२४ चा बेस्ट चीप अकाउंट पुरस्कार कामांमध्ये दक्ष असणारे चीफ कॏटंट रवींद्र काकडे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे होणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी सोशल मीडियावर सर्वत्र पसरताच, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलासजी खुळे सर, कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब, सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख व कामगारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.