महाराष्ट्र

प्रशांतराव परिचारक यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची घेतली भेट. | NCDC

आठवड्यात सकारात्मक निर्णय घेवू - बंसल, NCDC कार्यकारी संचालक

साखर मूल्यांकन दर वाढविण्याकरिता प्रशांतराव परिचारक यांचे दिल्ली येथे जोरदार प्रयत्न

नितीनजी गडकरी यांनी एन.सी.डी.सी. चे कार्यकारी संचालक बंसल यांना फोनवरून दिल्या सूचना 

आठवड्यात सकारात्मक निर्णय घेवू – बंसल, NCDC कार्यकारी संचालक

साखर मालतारण कर्जा वरील मूल्यांकन दर वाढवणेबाबत विनंती 

मालतारण कर्ज घेणाऱ्या सर्वच साखर कारखान्यांचा निधी उपलब्धतेसाठी होणार फायदा. 

सर्वच सहकारी साखर कारखान्यांकडून व्यक्त केले समाधान.

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी मंगळवार दिनांक 16/01/2024 रोजी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय रस्ते ‍विकास व परिवहन मंत्री नितीनजी गडकरीयांना भेटून एन.सी.डी.सी. कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) चे कार्यकारी संचालक बंसल साहेब यांना भेटून साखर मालतारण कर्जा वरील मूल्यांकन दर वाढवणेबाबत विनंती केली.

राज्यातील साखर कारखाने एन.सी.डी.सी कडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेतात. त्यांना  सध्या साखर मालतारण कर्जावरील  उचलीचा प्रति क्विंटल दर रुपये 3100/- इतका असून त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा जाता फक्त रु.2635 प्रति क्विंटल इतकीच रक्कम कारखान्यांना उपलब्ध होत आहे. तथापि दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडून साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रति क्विंटल रुपये 3400/- ते 3500/- पर्यंत आहे. तसेच साखरेचा बाजारभाव प्रति क्विंटल रुपये 3500/- ते 3700/- पर्यंत आहे. त्यामुळे एन.सी.डी.सी कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलीचा दर कमी असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम, व तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत असलेचे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  प्रशांतराव परिचारक मालक यांनी दिली. यावेळी साखर धंद्याचे जाणकार, साखर धंद्यास ऊर्जित अवस्था आणण्यासाठी सातत्याने धडपडणारे नितीनजी गडकरी यांना भेटून याबाबत निवेदन दिले. 

त्यास अनुसरून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी एन.सी.डी.सी. चे कार्यकारी संचालक बंसल यांना फोनवरून सूचना दिल्या असून प्रशांतराव परिचारक यांनीही राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक बंसल साहेब यांना भेटून साखरेचा मूल्यांकन दर वाढवणेकरिता विनंती व पाठपुरावा केला असून, येणाऱ्या आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे बंसल साहेब यांनी सांगितले. साखर मूल्यांकन दर वाढवण्यासाठी प्रयत्न केलेने एन.सी.डी.सी कडून साखर मालतारण कर्ज घेणाऱ्या सर्वच साखर कारखान्यांचा निधी उपलब्धतेसाठी फायदा होणार आहे. याबाबत सर्वच सहकारी साखर कारखान्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!