पांडुरंग कारखान्याचे रवींद्र काकडे ‘बेस्ट फायनान्स मॅनेजर’ पुरस्काराने सन्मानित
माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आजपर्यंत कारखान्यास देश व राज्य पातळीवरील ५० हून अधिक पुरस्कार, या पुरस्काराने पांडुरंग कारखान्याच्या लौकिकात भर पडली.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना बेस्ट फायनान्स मॅनेजर हा पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील ,जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, शेती अधिकारी संतोष कुमठेकर , चीफ केमिस्ट एम.आर. कुलकर्णी,ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, तानाजी भोसले, रमेश गाजरे, सोपान कदम आदी अधिकारी उपस्थित होते. काकडे यांनी सह कुटुंब पुरस्कार स्वीकारला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यातील साखर कारखान्याच्या व अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ठ कामकाजा बद्दल व सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन , उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवानी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण, आर्थिक व्यवस्थापन, उद्योगजकता, बेस्ट कार्यकारी संचालक, पर्यावरण अधिकारी , शेती अधिकारी, चीफ केमिस्ट, चीफ इंजिनियर, व तसेच जास्तीत जास्त उत्पादन घेणारे शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वामुळे कारखाना नेहमीच देशपातळीवर आपले नावलौकिक करण्यात अग्रेसर ठरलेला आहे. आजपर्यंत कारखान्यास देश व राज्य पातळीवरील ५० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराने पांडुरंगच्या लौकिकात भर पडली आहे.
कारखान्याचे चीफ अकॏटंट रवींद्र काकडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे , युटोपीयनचे अध्यक्ष उमेश परिचारक ,कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी , सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख व कामगारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.