भारतामध्ये साखर उद्योगात ‘बेस्ट एम.डी.’ – डॉ.यशवंत कुलकर्णी | पुरस्कार जाहीर | Best MD In India Dr.Yashwant Kulkarni |
10 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापूर येथे होणार पुरस्काराचे वितरण

भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन “सर्वोत्कृष्ट व्यवस्थापकीय संचालक साखर मिल पुरस्कार” – डॉ.यशवंत कुलकर्णी यांना जाहीर, राष्ट्रीय स्तरासाठी निवड
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना देश पातळीवरील “सर्वोत्कृष्ट व्यवस्थापकीय संचालक साखर मिल पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील निवडीमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. भारतामधील सर्व साखर उद्योगामध्ये अमूल्य योगदाना बद्दल त्यांच्या कामाची दखल घेत भारतीय शुगर या संस्थेमार्फत बेस्ट एमडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोख पारितोषिक रु. 50,000 00 (पन्नास हजार), ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, 10 फेब्रुवारी 2024 रोजी “भारतीय शुगर” तर्फे “सयाजी हॉटेल”, जुना पुणे बंगलोर हायवे, कावळा नाका, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शुगर सिम्पोजियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सदर पुरस्काराचे पत्र प्राप्त झाल्यानंतर, सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व संचालक मंडळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्र, पाहुणे या सर्वांनी सोशल मीडिया वरती व प्रत्यक्ष येऊन डॉ. यशवंत कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.