आश्रफाअली फकृद्दीन शेख आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत
गणेशगांवमधील आश्रफाअली फकृद्दीन शेख याला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत

संग्रामनगर (केदार लोहकरे) राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगावमध्ये जामखेडचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते आश्रफाअली फकृद्दीन शेख याला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा अश्राफआली याने राहूरी कृषी विद्यापीठ अंतर्गत हळगआंव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश घेतला होता.मागच्या तीन वर्षांपासून सर्वोत्कृष्ट गुण मिळवून विद्यार्थी परिषदेचे चेअरमन पद हि भूषविले आहे.आश्रफअली हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे.त्याचे कृषी अधिकारी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आर्थिक प्रगती बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे स्वप्न उराशी बाळगले आहे.त्याने महाविद्यालयातील गुणवंत आदर्श विद्यार्थी म्हणून नवलौकिक मिळवले आहे. त्याचे स्वप्न लवकरच साकार होवो असा आशीर्वाद त्याचे आई वडील व गणेशगांवातील गावकरी देत आहेत.
महसूल सप्ताह २०२३ निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी जामखेडचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सखेचंद अनारसे,निवडणूक साक्षरता मंडळ डॉ.मनोज गुड,मंडळ अधिकारी लटके तलाटी शेख आदी उपस्थित होते.या प्रसंगी नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी,महसूल विभागाच्या योजना यांची माहिती या उपक्रमातून मार्गदर्शन केले.