महाराष्ट्र

श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची नित्य पूजा करतो कॉलेजमध्ये शिकणारा युवक

दुर्गादेवी नित्य पूजा रोज पहाटे चार वाजता

श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची नित्य पूजा करतो कॉलेजमध्ये शिकणारा युवक

अकलूज दि.१३ (केदार लोहकरे ) अकलूज येथील श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ लोहार गल्ली या मंडाळामधील एक कॉलेज तरुण केदार रामलिंग हांडे हा रोज पहाटे दुर्गादेवीची नित्य पूजा करतो. मंडळाचे अध्यक्ष समीर माने यांच्याकडून विशेष माहिती समजावून घेतली. कु.केदार हांडे हा नित्य पुजेसाठी रोज पहाटे चार वाजता दुर्गादेवीच्या बंद दारासमोर हात जोडून आईसाहेबाचा गजर करून दार उघडून सर्व झाडलोट स्वच्छता करून देवीला रोज नवीन साडी नेसवतो त्यानंतर दुर्गादेवीची आरती केली जाते, विशेष म्हणजे हा तरुण नवरात्रमध्ये दुर्गादेवीची नऊ रूपाची देखणी सजावट करत असतो.अकलूजमधील नवरात्र महोत्सवातील नऊ रुप पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते.या कार्यामध्ये रोज पहाटे सुनिताताई पालखे मंदिराचा गाभारा स्वच्छ करतात तर अंगणामध्ये झाडलोट साडा घालून रांगोळी काढण्याचे काम चंदाताई पालखे करत असतात.देवीच्या या कार्यासाठी अनेक महिला सेवा म्हणून वेळ काढून येतात.

या मंडळाची स्थापना १३ ऑक्टोबर १९७७ साली झाली आहे. या मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील आहेत.मंडळाने आजपर्यंत देवीच्या मिरवणूक व नवरात्र काळामध्ये डिजे लावला नाही.गुलाल उधळला जात नाही. फक्त पारंपरिक वाद्य व कपाळावरती देवीच्या कुंकूवाचा गंध लावला जातो. समाजप्रबोधनपर नाट्य, पथनाट्य सादर केली,मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणूकीत व नवरात्रमध्ये सांस्कृतिक,पारंपरिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिके बक्षिसे मिळवली आहेत.सामाजिक,सांस्कृतिक आणी सर्व धर्म समभाव अशी आपली ओळख या मंडळाने आजपर्यंत जपली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!