६३ वर्षामध्ये ६२ वेळा रक्तदान करत वाढदिवस साजरा | मिलिंद गिरमे-जेष्ठ पत्रकार | पती-पत्नीने मिळून केले रक्तदान | Blood donation
वयाच्या २२ व्या वर्षांपासून रक्तदान करायला सुरुवात | Blood donation 2023

जेष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे उभयतांनी लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून केला साजरा
वयाच्या २२ व्या वर्षांपासून रक्तदान (Blood donation) करायला सुरुवात
अकलूज (केदार लोहकरे) माळशिरस तालुक्यातील जेष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी स्मिता गिरमे यांनी अकलूजच्या स.म.शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. मिलिंद गिरमे यांनी वयाच्या ६३ वर्षामध्ये ६२ वेळा रक्तदान करत वाढदिवस साजरा केलेले आहे. काल त्यांच्या लग्नाला ३७ वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्त गिरमे पती पत्नीने रक्तदान करून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.
मिलींद गिरमे यांनी वयाच्या २२ व्या वर्षांपासून रक्तदान करायला सुरुवात केली आहे. कधी कधी तर एखाद्या रूग्णाला ताबडतोब रक्ताची गरज असेल तेव्हा त्यांनी रक्तदान करून त्याचा जीव वाचवला आहे. फेब्रुवारी २०१० साली पुण्यात जर्मन बेकरी येथे बाॅंम्बस्फोट झाला होता. त्यावेळेस जखमींना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. त्यावेळी पत्रकार गिरमे हे पुण्यात होते. त्यावेळेस जनकल्याण रक्तपेढी ने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी स्वतः ब्लड बॅंकेत जाऊन रक्तदान केले होते. त्यानंतर अनेक वेळा तातडीचे रक्तदान करून अनेक रूग्णांना मदत केली आहे. त्यांच्या पत्नी स्मिता गिरमे यांनी लग्नाचा ३७ वा वाढदिवस साजरा करताना वैयक्तिक ११ वेळा रक्तदान केलेले आहे. अकलूजच्या ब्लड बॅंकेत आवर्जुन महिला स्वतः हून रक्तदान करायला जात नाहीत पण सौ.गिरमे यांनी ब्लड बॅंकेत जाऊन रक्तदान केलेले आहे.
पुर्वी २५ वेळा,५० वेळा रक्तदान करणा-या रक्तदात्यांचा सत्कार वेगवेगळ्या जिल्हात केला जात होता. यामध्ये मिलिंद गिरमे यांचा उदगीर, उस्मानाबाद, सांगली येथे सत्कार करण्यात आला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे त्यांची नोंद झाली आहे. गिरमे हे रक्तदानात आघाडीवर असल्यामुळे गोरगरिबांना गरजू लोकांना मोफत रक्त देऊन अनेकांना मदत केली आहे. हे कार्य करत असताना दोशी लॅबचे संचालक डॉ.संतोष दोशी व डॉ.बाहुबली दोशी यांचे प्रोत्साहन आणि मोलाचे सहकार्य लाभले आहे असे त्यांनी सांगितले. अकलूजच्या ब्लड बॅंकेचे डॉ.संतोष खडतरे यांनी त्यांचा सत्कार करताना सांगितले की, तुमच्या वयाच्या मानाने रक्तदान जास्त वेळा झाले आहे. आता यापुढे तुम्ही रक्तदान न करता इतरांना प्रवृत्त करण्याचे काम करा असा सल्ला दिला. यावेळी मिलिंद गिरमे म्हणाले की,100 हून अधिक रक्तदान करणारे दाते आहेत. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्यामुळे एखाद्याचे जीव वाचविण्यास मदत होते. सर्वांनी मानवतेचा धर्म संभाळत रक्तदान करत जावे.असे आवाहन केले आहे.
(Editor-Datta Naiknaware)