महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त अकलूज महिला पोलिसांचा गौरव | लिनेस क्लब अकलूजचा उपक्रम

कर्तव्य, सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी  एकावेळी पार  पडणाऱ्या महिलांचा गौरव

कर्तव्य, सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी  एकावेळी पार  पडणाऱ्या महिलांचा गौरव

अकलूज तालुका माळशिरस येथील लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे व त्यांच्या इतर सर्व महिला सदस्यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व महिला पोलिसांचा महिला दिनाचे औचित्य साधून गौरव केला.  पोलीस सेवेत आपली कर्तव्य पार पाडत असताना त्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत असतात,  या सर्व कार्याचा आढावा घेऊन पोलीस महिलांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे व पीएस आय महाडिक यांचा सत्कार लिनेस डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे यांनी केला. यावेळी महिला पोलीस अंमलदार लोखंडे, पिसे, चव्हाण, सोनवणे व पोलीस हवालदार मदभावी यांचा सत्कार लिनेस डिस्ट्रिक्ट सचिव राजश्री जगताप, लि डि ख. विद्या गिरमे, होम क्लब अध्यक्षा संगीता दोशी, प्रतिभा इंगोले-देशमुख, मुन्नी काजी, सुप्रिया मुदगल या सर्वांनी महिला पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे सत्कार केले.

यावेळी सुप्रिया मुदगल यांनी नारी शक्तीचा सन्मान याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तुत्व गाजवलेल्या व आदर्श महिलांच्या कार्याची उदाहरणे देऊन त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतामधून सांगितला. सर्व महिला पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लीनेस क्लब च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!