श्रीपूर | कॅनॉल मध्ये वाहत आला वृद्धाचा मृतदेह
भाटघर कॅनॉल मध्ये वाहत आला वृद्धाचा मृतदेह | पोलीस तपास सुरू

भाटघर कॅनॉल मध्ये वाहत आला वृद्धाचा मृतदेह | पोलीस तपास सुरू
श्रीपूर तालुका माळशिरस येथील, श्रीपूर-महाळुंग चौकी सेक्शन-यमाईनगर दरम्यान भाटघर कॅनॉल मध्ये आज सकाळी सातचे सुमारास साधारण वय 75 वर्ष असलेल्या एका वृद्धाचा मृतदेह वाहत आल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच अकलूज पोलीस स्टेशनला याची खबर दिली गेली.
रात्री भाटघर कॅनॉलला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. त्यामुळे हा मृतदेह श्रीपूरच्या दिशेने वाहत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकलूज पोलिसांनी सकाळी कॅनॉल मधून मृतदेह बाहेर काढून ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो अकलूज पोलीस स्टेशन, वेळापूर पोलीस स्टेशन, माळशिरस पोलीस स्टेशन व नातेपुते पोलीस स्टेशनच्या सर्व ग्रुप वरती पाठवून नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.
स्थानिक समाजसेवक राजू गुजले व पोलिसांच्या मदतीने कॅनॉल मधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अकलूज जिल्हा उप रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे. वृद्ध पुरुषाचा मृतदेह कॅनलमध्ये वाहत आल्याची बातमी समजतात पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुढील तपास अकलूज पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.