मृतदेहाची ओळख पटली | श्रीपूर | कॅनॉल मध्ये वाहत आला होता वृद्धाचा मृतदेह | Akluj Police
भाटघर कॅनॉल मध्ये वाहत आला होता वृद्धाचा मृतदेह

अकलूज पोलिसांनी तपास करून मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात
श्रीपूर ता.माळशिरस येथील श्रीपूर-महाळुंग चौकी सेक्शन-यमाईनगर दरम्यान भाटघर कॅनॉल मध्ये गुरुवारी सकाळी सातचे सुमारास साधारण वय 75 वर्ष असलेल्या एका वृद्धाचा मृतदेह वाहत आल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच अकलूज पोलीस स्टेशनला याची खबर दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता
रात्री भाटघर कॅनॉल ला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले होते. त्यामुळे हा मृतदेह श्रीपूरच्या दिशेने वाहत आला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकलूज पोलिसांनी सकाळी कॅनॉल मधून मृतदेह बाहेर काढून ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो अकलूज पोलीस स्टेशन, वेळापूर पोलीस स्टेशन, माळशिरस पोलीस स्टेशन व नातेपुते पोलीस स्टेशनच्या सर्व ग्रुप वरती पाठवून नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, खंडाळी दत्तनगर येथील मयत व्यक्ती रामदास शिवाजी पवार असे मयत वृद्धाचे नाव आहे. तपासासाठी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, हवलदार किशोर गायकवाड, पो. कॉ. दर्लिंग गुरव, आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी तपास करून,नातेवाईकांचा शोध लावला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.